‘पुष्पा’ चित्रपटातील भवरसिंग शेखावत इंदिरा नगर पोलीस ठाण्यात!

नाशिक | प्रतिनिधी

पुष्पातील भवर सिंग शेखावत आठवतोय, हो तोच ‘शिलावती, चोखो माल से’ वर धमाकेदार एन्ट्री करणारा. असाच एक भवरसिंग शेखावत आपल्या नाशिकमध्ये पाहायला मिळतो आहे. सागर पाटील असे या पोलीस शिपायाचे नाव आहे.

पोलीस शिपाई सागर पाटील

सध्या सर्वत्र चर्चा असलेल्या ‘पुष्पा-द राईज’ या चित्रपटातील पोलीस अधीक्षकाची भूमिका बजावणारे भवरसिंग शेखावत यांच्यासारखा दिसणारा सेम टू सेम दिसणाऱ्या इंदिरानगर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई चांगलाच चर्चेत आला आहे.

नाशिकमध्ये इंदिरानगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सागर पाटील हे सेम टू सेम भवरसिंग शेखावत सारखे दिसत आहेत. त्यामुळे परिसरात व सोशल मीडियावर सध्या सागर पाटील व भवरसिंग शेखावत यांचे फोटो व्हायरल होत आहेत.

यामुळे पोलीस शिपाई सागर पाटील हे सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी कर्मचारी व नागरिक गर्दी करत आहेत. त्यांना पाहिल्यानंतर भवरसिंग शेखावत ची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.