Home » नाशिकच्या निओ मेट्रोचे लवकरच भूमिपूजन होणार!

नाशिकच्या निओ मेट्रोचे लवकरच भूमिपूजन होणार!

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकच्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सुविधेत आता आणखी मोठी भर पडणार असून लवकरच निओ मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असल्याची माहिती आहे.

शहर परिसरातील जळजवळ ३१ किलिमिटर मार्गावर धावणाऱ्या देशातील पहिल्या टायरबेस निओ मेट्रो प्रकल्पाचा मान हा नाशिकला मिळाला असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये फडवणीस यांच्याकडून मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय मंत्री मंडळाची मान्यता घेऊन या प्रकल्पाचे ऑनलाइन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भूमीपूजनाची तय्यारी सुरू झाल्याची माहिती आहे.

मागील वर्षी केंद्रीय अर्थसंकल्पात संबंधीत प्रकल्पासाठी दोन हजार कोटींची तरतूद करूनही प्रकल्पाचे भूमिपूजन झाले नव्हते.मात्र आता देशातील नाशिकमधील पहिला प्रकल्प म्हणून निओ मेट्रोचे भूमिपूजन करण्याची तय्यारी फडवणीस यांनी केली आहे. या निओ मेट्रो साठी शहरात सुरुवातीला दोन एलिव्हेटेड कॉरिडोर उभारले जाणार आहे. पहिला एलिव्हेटेड कोरिडोर हा १० किलोमीटर लांबीचा असून त्यात गंगापूर, जलालपूर, गणपत नगर, काळेनगर, जेहान सर्कल, थत्तेनगर, शिवाजी नगर, पंचवटी, CBS, मुंबई नाका,अशी स्थानके असेल.

दुसरा कोरिडॉर हा गंगापूर ते नाशिकरोड असा २२ किलोमीटर लांबीचा असून त्यात गंगापूर गाव, शिवाजी नगर, श्रमिक नगर, MIDC , मायको सर्कल, CBS, सारडा सर्कल, द्वारका, गांधीनगर, नेहरू नगर, दत्त मंदिर, नाशिकरोड अशी स्थानके असणार आहे. CBS हे कॉमन स्टेशन असून एकूण 29 स्टेशन असणार आहे. हा न्यू मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा असून गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला प्रकल्प सुरु करण्यासाठी फडणवीस यांनी कंबर कसली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून नाशिक दौऱ्यावर या प्रकल्पाबाबत मित्र प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून संबंधित प्रकल्पासाठी पालिकेने जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर किमान नाशिकचा प्रकल्प तरी सुरू करता यावा यासाठी खुद्द फडणवीस यांनी लक्ष घातल्याचे समजते आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!