नाशिक महापालिकेची मोठी कारवाई; केले ६०० किलो ‘प्लॅस्टिक’ जप्त

‘एकच ध्यास ठेवूया, प्लास्टिक पिशवी हटवूया, समृद्ध पर्यावरणाचे रक्षण करुया’ या घोषवाक्यानुसार मनपाकडून नाशिक शहरातून मागील सहा महिन्यांपासून तब्बल ६०० किलो प्लॅस्टिक जप्त केले आहे. सोबतच ९ लाख रुपयांचा दंड देखिल वसूल करण्यात आला आहे. आणि जे ६०० किलो प्लॅस्टिक जप्त केले आहे ते रिसायकलिंगसाठी पाठवण्यात आल आहे. नाशिक महापालिकेने प्लॅस्टिक बंदी मोहिमेची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे . हरीत नाशिक-स्वच्छ नाशिकच्या ध्येयासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रभावी कामगिरी करीत आहे.

केंद्र सरकारकडून देखील १ जुलैपासून संपूर्ण देशात प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. तसे, काही प्रमाणात हे निर्बंध आधीपासूनच लागू आहेत. आता सरकारच्या आदेशानुसार एकच उत्पादन, साठवणूक, वापर, वितरण आणि विक्रीवर पूर्ण बंदी असणार आहे. या आदेशानुसार १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात येणार होती. या निर्बंधाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असून यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना २५ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. एवढेच नाही तर तीन महिन्यांच्या कारावासाची तरतूदही करण्यात आली आहे.


दरम्यान, नाशिक महानगरपालिकेने देखील प्लॅस्टिक बंदी मोहिमेची कडक अंमलबजावणी केली आहे. गेल्या सहा महिन्यात म्हणजेच जानेवारी ते जून महिन्यात १७४ केसेसमधून ९ लाख पाच हजारांचा दंड वसूल केला आहे. तब्बल ६०० किलो प्लॅस्टिक जप्त केले आहे. ‘एकच ध्यास ठेवूया, प्लास्टिक पिशवी हटवूया, समृद्ध पर्यावरणाचे रक्षण करुया’ या घोषवाक्यानुसार मनपाकडून जनजागृती केली जात आहे. ‘गुडबाय सिंगल युज प्लास्टिक, आता आपल्यामुळेच फरक पडेल’ हा विचार नागरिकांच्या मनात रुजवला जात आहे. पर्यावरण रक्षणाकामी आणि सार्वजनिक स्वच्छतेसाठी प्रभावीपणे जनजागृती केली जात आहे. प्लॅस्टिक न वापरण्याची दुकानदारांना सातत्यानं सुचना केली जात आहे. ‘हरीत नाशिक-स्वच्छ नाशिक’च्या ध्येयासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी आयुक्त रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रभावी कामगिरी करीत आहे.