भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव चेडे यांचा येवल्यात सत्कार

येवला । प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी येथील कॅप्टन संकेत चेडे यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल येवला भारतीय जनता पार्टी व शिंदे समर्थकांच्या वतीने यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्यांचे आजोबा शेतकरी कामगार पक्षाच्या विचाराशी जोडले असल्या कारणामुळे सामाजिक कार्याची आवड कॅप्टन संकेत यांना घरातूनच मिळाली. त्यामुळे त्यांनी आता भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेऊन थेट प्रदेशाची जबाबदारी स्वीकारली.

तालुक्यातील ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांचे ते जावई असल्यामुळे त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील रायगड ग्रुप चे कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या सत्कार समारंभाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी भाजप पदाधिकाऱ्यां त्यांच्या प्रत्येक भाषणातून माणिकराव शिंदे यांना भाजपात येण्यासाठी आग्रह केला तर आता जावई पक्षाचे प्रदेश सचिव झाले आहेत. तुम्ही तालुक्याचे नेते व्हा असं देखील कार्यकर्त्यांनी सांगितले.

तालुक्‍यात नगरपालिकेवर जरी भाजपाचा नगराध्यक्ष असला तरी ग्रामीण भागात भाजपाची पाळेमुळे मजबूत करण्यासाठी तालुकास्तरावर मोठ्या नेतृत्वाची गरज येथील भाजपाला आहे. त्यात एकेकाळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तसेच छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय माणिकराव शिंदे हे सध्या कुठल्या पक्षात नसल्यामुळे त्यांनी भाजपची वाट धरावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे शिंदे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी असलेले नवनिर्वाचित युवा मोर्चाचे प्रदेश सचिव चेडे यांनी यांच्या भाषणातून माझा परिवार भाजपात आला आहे. आता येणाऱ्या काळात येवल्याचा परिवार देखील भाजपात आणण्यासाठी प्रयत्न करेन असे म्हटले.

तसेच माणिकराव शिंदे म्हणाले की येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचे गाळे जर गुंफण्याची वेळ आली तर भविष्यात विचार करू, परंतु आज तरी असा माझा काहीही विचार नाही. त्यामुळे शिंदे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम खुद्द त्यांनीच दिला.

यावेळी भाजपा प्रांतिक सदस्य बाबा डमाळे, उपजिल्हाप्रमुख आनंद शिंदे, तालुका अध्यक्ष नंदकिशोर शिंदे, ओबीसी सेलचे राजु परदेशी, नगराध्यक्ष बंडू, सरचिटणीस नानासाहेब लहारे, शहराध्यक्ष तरंग गुजराती, युवक मराठा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग शेळके, नगरसेवक प्रमोद सस्कर, गोरख खैरनार, दत्ता सानप, बाळासाहेब साताळकर, समीर समदारिया, डॉ. संकेत शिंदे, शाहू शिंदे, नगरसेवक सचिन शिंदे, सुदाम सोनवणे, राजेंद्र गायकवाड, सुभाष गायकवाड, सुभाष निकम, सुरेश कदम, बाळासाहेब पठारे यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.