#Breaking : पालकमंत्री आणि आयुक्त यांच्या तोंडाला काळे फासा

नाशिक । प्रतिनिधी

सातपूर परिसरात सकाळी झालेल्या खुनानंतर वातावरण चिघळले असून नाशिक भाजपा पदाधिकऱ्यासंह परिसरातील नागरिकांनी सातपूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

दरम्यान आज सकाळच्या सुमारास सातपूर परिसरातील भाजपा मंडळ अध्यक्ष अमोल इघे यांची युनियनच्या वादातून हत्या करण्यात आली. मात्र यानंतर सातपूर परिसरात तणाव निर्माण होऊन पोलीस ठाण्यासमोर गर्दी झाली. यावेळी नाशिक शहरातील भाजप पदाधिकारी , परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले. त्याचबरोबर सातपूर पोलीस ठाण्याच्या समोर बसून आंदोलन सुरु केले.

https://youtu.be/LZMYqbGjyW8

यावेळी नाशिक पोलिसांच्या गचाळ कामगिरीवर भाजपा पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. यामध्ये भाजपा नेते लक्ष्मण सावजी यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर अशांत असून याला कारणीभूत नाशिक पोलीस आयुक्त तसेच पालकमंत्री जबाबदार आहेत. दिवसाढवळ्या, खून घरफोड्या चोऱ्या होत असल्याने नागरिक सुरक्षित आहेत का? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर पोलीस आयुक्त आणि पालकमंत्री यांनी तोंड काळे करावे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी भाजपा नेते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले आदींसह पदाधिकारी तसेच सातपूर परिसरातील नागरिक उपस्थित होते.