सातपुर येथे युनियनच्या वादातुन भाजपा पदाधिकाऱ्याचा खून

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरातील सातपूर परिसरात भाजपा मंडळ अध्यक्ष अमोल इघे यांची अज्ञात कारणावरून हत्या करण्यात आली आहे. यामुळे नाशिक शहरात खळबळ उडाली असून अवघ्या चार दिवसांमध्ये तीन हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहे.

सातपूर परिसरातील भाजपा मंडळ अध्यक्ष अमोल इथे हे आज सकाळी कामगार युनियन च्या कामाकरता सकाळच्या सुमारास सातपूर एमआयडीसी मध्ये गेले होते. त्यावेळी तेथे अंतर्गत वाद झाले. आणि त्या वादातून धारदार शस्त्राने अमोल इथे यांच्यावर वार करण्यात आले.

यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मागील चार दिवसांमध्ये शहरांमध्ये ही तिसरी घटना घडली आहे.

राजकीय वैमनस्यातून हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सातपुर पोलीस करीत आहे.