Home » शरद पवारांच्या हाती धनुष्यबाण!

शरद पवारांच्या हाती धनुष्यबाण!

by नाशिक तक
0 comment

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत इगतपुरी परिसरातील सोनाशी येथे बिरसा ब्रिगेड संघटना आयोजित आदिवासी सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रम पार पडला.वासाळी फाटा येथे राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमानंतर सोनाशी येथे आदीवासी सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाला देखील शरद पवार यांच्यासह पालकमंत्री छगन भुजबळ,मंत्री जितेंद्र आव्हाड,आदी नेते उपस्थित होते.


या कार्यक्रमात बोलताना,” आदिवासी समाजातील नागरिक हेच देशाचे मूळ नागरिक असल्याचे प्रतिपादन शरद पवार यांनी केले”.जंगल वाचवण्याची जबाबदारी देशातील प्रत्येक नागरिकांची आहे असे म्हणत आदिवासी समाज आज देखील संघर्ष करत असलयाचे मत शरद पवारांनी व्यक्त केले.आदिवासी समाजातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व जणांनी प्रयत्न करावे असे आव्हान करत, मी देखील राज्यातील आदिवासी भागात जाऊन तरुणांशी संवाद साधणार असल्याची माहिती यावेळी शरद पवार यांनी दिली.


पुढच्या काही दिवसात मी चंद्रपूरला जाऊन आदिवासी भागाची पाहणी करणार असल्याचे सांगत, आदिवासी समाजासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे ,असे देखील पवार यांनी म्हणटलंय.दरम्यान या कार्यक्रमाच्या सुरुवातीला बिरसा ब्रिगेड संघटनेच्या वतीने शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारावेळी वेळी शरद पवार यांच्या हातात धनुष्यबाण देत सत्कार करण्यात आल्याने ” शरद पवार यांच्या हातात धनुष्यबाण ” अशी एकच चर्चा कार्यक्रमस्थळी रंगल्याची पाहायला मिळाली.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!