सातपूर परिसरात बंगल्यावर धाडसी दरोडा,

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकच्या सातपूर परिसरात मोठा दरोडा पडल्याची घटना घडली आहे. येथील एका प्रसिद्ध उयोजकाच्या घरावर हा दरोडा पडला असून या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे.

नाशिकला चोरी, घरफोडीच्या सातत्याने उघडकीस येत आहेत. आता दिवसाढवळ्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच सातपूर परिसरात एका बंगल्यावर दरोडा पडला आहे. येथील प्रसिद्ध उद्योजक बाबुशेठ नागरगोजे यांच्या बंगल्यावर दरोडा टाकण्यात आला आहे. या दरोड्यात एक ते दीड किलो सोने आणि रोख रक्कम पळवल्याचे समोर आले आहे.

दरम्यान या दरोडेखोरांनी बंगल्यातील लोकांना शास्राचा धाक दाखवून दरोडा टाकला आहे. यामध्ये नागरगोजे यांच्या घरातून एक ते दीड किलोचे सोने चोरटयांनी लंपास केले आहे. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

घटनेची माहिती मिळाल्यांनतर सातपूरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह डॉग स्कॉड दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.