इगतपुरी बनतंय बिबट्याचे माहेरघर, दोन बछडे जेरबंद

नाशिक | प्रतिनिधी

इगतपुरी शहर परिसरात गेले काही दिवस सतत आढळत असलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांना वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद केले. आज पहाटेच्या सुमारास हे दोन बछडे पिंजऱ्यात कैद झाले.

इथे पहा व्हिडीओ :

https://youtu.be/Fwu_icbb68I

इगतपुरी सह तालुक्यात बिबट्याची दहशत काही नवीन नाही. तालुक्यातील काळूस्ट, दरेगाव आदी परिसरात बिबट्याने दोन लहान मुलांचा बळी घेतला. त्यांनतर बिबट्याने आपला मोर्चा आता शहरी भागात वळविला आहे. मागे शहरातील सहयाद्री नगर येथे एक बिबट्या जेरबंद करण्यात आला होता. तर १५ दिवसापूर्वी २ बिबटे याच जेरबंद केले होते.

आज पहाटेच्या सुमारास दोन बिबट्याचे बछडे पिंजऱ्यात अडकल्याने परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.याबाबत नागरिकांनी वनविभागाचे आभार मानले आहेत.