Home » धक्कादायक ! महिला सरपंचावर आत्महत्या करण्याची वेळ

धक्कादायक ! महिला सरपंचावर आत्महत्या करण्याची वेळ

by नाशिक तक
0 comment

नाशिक | प्रतिनिधी

निफाड तालुक्यातील मरळगोई येथील महिला सरपंचाने राहत्या घरी विषारी औषध सेवन केल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.२२) रात्री घडली.

दरम्यान मयत सरपंचाच्या भावाच्या फिर्यादी वरून सासर कडील चौघा विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मरळगोई खुर्द च्या विद्यमान महिला सरपंच योगीता फापाळे यांनी मंगळवारी राहत्या घरी रात्री साडे आठच्या दरम्यान विषारी औषध सेवन केले. त्यांचे पती अनिल फापाळे यांनी उपचारासाठी लासलगाव येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तपासणी दरम्यान डॉक्टरांनी सदर महिलेस मृत घोषित केले.

मयत योगिताचे भाऊ संतोष शांताराम गवळी (रा. मकरंदपूर ता.कन्नड० यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार योगिताने सासरच्या छळाला कंटाळून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली आहे. तक्रारीवरून पती अनिल बाबासाहेब फापाळे, सासरे बाबासाहेब फापाळे, सासु सरला फापाळे आणि दिर प्रदीप फापाळे (सर्व रा. मरळगोइ खुर्द) या चौघांविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी तिघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे करत आहे

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!