Home » भाजीपाल्याचा व्यवसाय करणाऱ्या एकाचा पेठरोडवर खून

भाजीपाल्याचा व्यवसाय करणाऱ्या एकाचा पेठरोडवर खून

by नाशिक तक
0 comment

नाशिक | प्रतिनिधी

नाशकात खुनाचे सत्र सुरूच असून म्हसरूळ परीसरातील खुनाच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच पेठरोड वर आणखी एक खुनाची घटना समोर आली आहे.

पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेठरोड वरील आरटीओ कार्यालयासमोर मध्यरात्रीच्या सुमारास एकाची डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. राजेश शिंदे (रा.भराड वाडी, फुलेनगर) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत राजेश शिंदे हा रात्री १२ ते १२. ३० च्या सुमारास घरी जात होता. यावेळी आरटीओ ऑफिस समोरील रस्त्यावर दबा धरून बसलेल्या अज्ञात इसमानी शिंदे यांना अडवून त्यांच्या डोक्यात दगड घातला.यात शिंदेचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक्त मधुकर गावित, पंचवटी येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिताराम कोल्हे आणि इतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र रात्रीचा फायदा घेत अज्ञात मारेकरी पसार झाले.

राजेश शिंदे याचे मार्केटमध्ये भाजीपाला विक्रीचे छोटे दुकान होते. त्यामुळे हा खून वर्चस्ववादाच्या कुरपतीतून झाल्याचे समजते आहे. दरम्यान म्हसरूळ आणि पंचवटी घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वर्चस्व वादाच्या या भोवऱ्यात नेमकी वर्चस्व नाशिक पोलिसांचे की नाशिक मधील गुन्हेगारांचे या बद्दल सवाल उपस्थित झाला आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!