धक्कादायक ! प्रेम विवाह केल्याने भावाने बहिणीचे मुंडके तोडले

औरंगाबाद । प्रतिनिधी

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुर तालुक्यात प्रेमविवाह केल्यामुळे भावानेच सख्ख्या बहिणीची निर्घृण हत्या केल्याची घटनासमोर आली आहे. किशोरी मोटे असे हत्या करण्यात आलेल्या विवाहितेचे नाव आहे. सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील लाडगाव शिवारात राहणाऱ्या तरुणाने बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून, कोयत्याने वार करून तिची हत्या केली. एक महिन्यापूर्वी बहीण आणि तिचा प्रियकर विवाह करून आले होते. बहिणीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्याच्या राग मनात ठेवून भावाने बहिणीवर हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे हत्या करणारा भाऊ अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. संकेत मोटे असे हत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

घटनस्थळी विवाहितेचा पती देखील उपस्थित होता मात्र तिच्या पतीने पळ काढल्याने त्याचा जीव वाचला. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. किशोरीने सहा महिन्यांपूर्वी पुण्यातील आळंदी येथे प्रेमविवाह केला होता. किशोरी दोन महिन्याची गर्भवती होती. पोलिसांनी संशयित आरोपी भावाला आणि आईला ताब्यात घेतले आहे.