महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास भुजबळ यांच्याकडून अभिवादन

नाशिक । प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. यावेळेस माजी आमदार पंकज भुजबळ उपस्थित होते.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच दिला. त्यांचे हे विचार देशाला एकसंघ ठेवण्यास आणि समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची अंमलबजावणी करून त्यांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेचे संरक्षण आपण सर्वांनी करूया असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.