शनिवार, जून 3, 2023
घरताज्या बातम्याभावपूर्ण श्रद्धांजली ! लष्कर प्रमुख बिपीन रावत यांचे निधन

भावपूर्ण श्रद्धांजली ! लष्कर प्रमुख बिपीन रावत यांचे निधन

दिल्ली | प्रतिनिधी
अखेर सिडीएस बिपीन रावत यांची मृत्यूला झुंज देत असताना त्यांचे निधन झाले आहे. यासोबतच हेलिकॉप्टर मधील इतर अधिकाऱ्यांचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्व भारत शोकाकुल वातावरणात आहे.

आज दुपारी पावणे एकच्या सुमारास भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टर ला अपघात झाला होता. यामध्ये भारतीय लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर अकरा अधिकारी होते. ते हवाई दलाच्या सुलूर बेसवरुन वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्विसेस कॉलेजमध्ये निघाले होते. दरम्यान दुपारच्या सुमारास कर्नाटकातील कुन्नूरजवळ निलगिरी कट्टेरी ही दुर्घटना घडली.

अपघातानंतर हेलिकॉप्टरने पेट घेतल्याने अधिकारी गंभीर जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र रुग्णालयात जाण्यापूर्वी अनेकांची प्राणज्योत मालवली.

हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काही मिनिटांपूर्वी त्यांच्या निधनाची बातमी आली. अपघात झाल्यापासून सर्व भारतीय त्यांच्या स्वास्थसाठी प्रार्थना करीत होते. या घटनेने देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप