कसाऱ्याजवळ इनोव्हा-ओमनीचा भीषण अपघात, युवकाचा मृत्यू

नाशिक । प्रतिनिधी

मुंबई-नाशिक महामार्गावरील ओहळाची वाडीजवळ झालेल्या इनोव्हा-ओमनीचा अपघातात २६ वर्षीय तरुणच मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत. रफिक मणियार (२६) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, रफिक आणि त्याचे मित्र ओमनीतून रात्रीच्या ११.३० च्या सुमारास चहा नाश्त्यासाठी महामार्गावर थांबले होते. चहा नाष्टा केल्यानंतर ओहळाची वाडीजवळ आले असता समोरून आलेल्या इनोव्हा कार ने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात ओमनी चालक रफिक मणियार याला गांभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला. सोबत असलेले दोन मित्र गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सलमान खतीब करत आहे.

घटनेची माहिती मिळताच वाहतुक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, बचावकार्य हाती घेतले होते. तसेच अपघातग्रस्त दोन्ही वाहने हायड्रा क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या एका बाजूला करत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. याप्रकरणी पुढील कार्यवाही पोलीस विभागामार्फत सुरूआहे. दरम्यान मुंबई नाशिक महामार्ग अतिशय धोक्याचा होत असून या महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना होत आहेत.