नाशिककर ! थर्टी फस्टची पार्टी आता घरातच, असे आहेत निर्बंध

नाशिक । प्रतिनिधी

थर्टी फस्ट पार्टीचे सेलिब्रेशन (New Year Celebration) आता घरातच करावे लागणार असून नाशिक पोलिसांकडून (Nashik Police) याबाबत आदेश जारी केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नियमावली जाहीर (New Year Celebration Guidelines) करण्यात आली आहे.

कोरोना ओमायक्रोन व्हेरिएंटच्या (Omicron Verient) पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस आयुक्तलयाकडून (Nashik CP Office) रात्रीची जमावबंदीसह रेस्टॉरंट, बार सिनेमागृह, मॉल्स, दुकाने यांच्यासाठी शहर पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Nashik Police Commissioner Dipak Pandey) यांनी नवीन मनाई आदेश २७ जानेवारीपर्यंत लागू केले आहेत. तसेच ३१ डिसेंम्बरच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांची नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ५ किंवा ५ पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी (Public Place) एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे थर्टी फस्टचे सेलिब्रेशन आता घरातच करावे लागणार आहे.

दरम्यान राज्याने नियमावली जाहीर (Maharashtra Government Guidelines) केल्यानंतर नाशिक पोलिसांनी देखील नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार नव वर्षाच्या स्वागतासाठी रात्री नऊ वाजेनंतर आयोजित पार्ट्यांवरही (31 December Party) निर्बंध लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कुठल्याही कारणांसाठी सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. मॉल्स, उपहार गृहे, दुकाने जागा मालक सर्वाना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा आस्थापणावर कारवाई (Police Action) होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

असे आहेत निर्बंध

खुले बँक्वेट, बंदिस्त मंगल कार्यालयांमध्ये उपस्थितांची संख्या १०० पेक्षा जास्त नको. मैदान, लॉन्समध्ये होणाऱ्या सोहळ्यांमध्ये उपस्थितांची संख्या त्या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के अथवा २५० पेक्षा जास्त असता कामा नये. सिनेमागृहे, सभागृहे, रेस्टॉरंट, नाट्यगृहे, स्पा, मल्टीप्लेक्समध्ये क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे.. विविध क्रीडा स्पर्धांच्या ठिकाणी आसनक्षमतेच्या २५ टक्के प्रेक्षकांची संख्या असावी. रात्री नऊ वाजेपासून तर पहाटे सहा वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना जमावबंदी.