नाशकात शुभमंगल सावधान, कोरोनाचे मात्र हरवले भान!

नाशिक । प्रतिनिधी

नव्या ओमायक्रोन व्हेरिएंटच्या (Omicron Verient) पार्श्वभूमीवर राज्य शासनासह (State Govenment) नाशिक जिल्ह्यात विवाह सोहळ्यावर निर्बंध (Restrictions On Marriage) लागू करण्यात आले आहेत. मात्र नाशिक शहरासह (Nashik City) जिल्ह्यात सर्रास विवाह सोहळे मोठ्या गर्दीत होतांना दिसून येत आहेत. कालच नाशिकमध्ये एका राजकीय नेत्याच्या मुलीचा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. मात्र या ठिकाणी कोरोनाच्या नियमाचा (Corona Rules) विसर पडल्याचे दिसून आले.

सध्या ‘शुभमंगल सावधान’ असे म्हणत विवाह उरकून घेण्याचे प्रकार शहरासह ग्रामीण भागात (Rural Area) दिसत आहेत. कोरोना परिस्थितीत कुठलीच सामाजिक अंतराची मर्यादा राहिलेली नाही. राज्य शासनाचे पार्श्वभूमीवर लग्न समारंभ अतिशय मर्यादित स्वरुपात करण्याचे निर्देश असतानाही नाशिकसह जिल्ह्यात धूमधडाक्यात लग्नाचा बार उडवण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर, मास्कचा वापर होताना दिसत नाही.

असाच शाही विवाह सोहळा काल नाशकात पार पडला. या विवाह सोहळ्याला खासदार संजय राऊत (Sanjay Raut), मंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde), आमदार अब्दुल सत्तार आदींसह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.तर दुसरीककडे थाटामाटात पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. त्यामुळे या विवाहसोहळ्यात गर्दी झाल्याने कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले.

नव्य ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकतीच नवी नियमावली जाहीर केली आहे. यात लग्न सोहळे आदींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
मात्र असे असूनही सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवत विवाह साजरे होत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. ग्रामीण भागातही विवाह सोहळे पार पडत आहेत. या विवाह सोहळ्यांना नातेवाईक गर्दी करत आहेत. त्यामुळे प्रशासन याबाबत ठोस पाऊले उचलणे आवश्यक आहे.