राज्यात ओमायक्रोनचा विस्फोट, एकाच दिवसात आढळले तब्बल ‘इतके’ रुग्ण

नाशिक | प्रतिनिधी

ओमायक्रोनने राज्याची चिंता वाढवली असून एकाच दिवशी तब्बल ८७ रुग्ण आढळुन आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

दिवसेंदिवस कोरोना सारखा राज्यात पाय पसरतो आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे राज्यात ओमायक्रोन ची रुग्णसंख्या वाढते आहे. दरम्यान यामध्ये ४३ प्रवाशांचा आंतरराष्ट्रीय प्रवास तर त्यांच्या सहवासातून चार जणांना बाधा झाली असून तर ३७ जणांचा कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास नाही. परंतु या ८७ रुग्णांनी राज्याची चिंता वाढली आहे.

दरम्यान या रुग्णसंख्येत सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत. ३४ रुग्ण आढळल्याने मुंबई प्रशासन अलर्ट झाले आहे. स्फोटक रुग्णवाढीनंतर मुंबई महापालिकाही अलर्ट मोडवर आली आहे, मुंबई महापालिकेडून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे.

दरम्यान हॉटेल व उपहारगृहांचे दैनंदिन सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत. महानगरपालिका आणि पोलीस प्रतिनिधींचे संयुक्त भरारी पथक लक्ष ठेवणार आहे. संयुक्त अरब अमिराती देशांमधून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना आगमन प्रसंगी आरटीपीसीआर चाचणी आणि सात दिवसाचे क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले आहे.