पिंपळगाव येथील पोलीस स्टेशन समोरून महिलेची पोत लांबविली!

नाशिक । प्रतिनिधी
राज्यातील महत्त्वाच्या शहरापैकी एक असलेल्या नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून क्राईम रेट इतका वाढला आहे की, दिवसाढवळ्या घरफोडी, लूट, चोरी सारखे गुन्हे घडत आहेत. मात्र पोलिसांच्या नाकावर टिच्चून गुन्हेगार गुन्हेगारी करताना दिसत आहेत.

आतातर पोलीस स्टेशनसमोरून चोरटयांनी महिलेची पोत लांबविल्याची घटना घडली आहे. पिंपळगाव पोलीस स्टेशन समोर हि घटना घडली आहे. मात्र चोरटे पोत लांबवून दुचाकीवर फरार झाले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षे बाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून खुन, दरोडे, चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. नुकतीच दोघा पिता पुत्रांची निघृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना काल उघडकीस आली. याचबरोबर काही दिवसांपूर्वी वाजे हत्याकांड घडले. चोरी, लूटमार आदी घटना तर राजरोसपणे घडतांना दिसून येत आहेत. त्यामुळे नाशिक पोलिसांचा धाक आहे कि नाही असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

दरम्यान पिंपळगाव येथील पोलीस स्टेशन समोरून येणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरटयांनी लांबविली आहे. हि चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असली तरी चोरटे मात्र पसार झाले आहेत.