काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये!

नाशिक । प्रतिनिधी

काचेच्या घरात राहण्यानी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये, आरोप झाले तर प्रत्यारोप होणार असा टोला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लगावला आहे.

भुजबळ फार्मवर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते यावेळी म्हणाले कि, काचेच्या घरात राहण्यानी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये, आरोप झाले तर प्रत्येयरोप होणारच, सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे, यासदर्भात सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधान, राष्ट्रपती यांची भेट घेतली पाहिजे, विरोधी पक्षाचे सरकार ज्या ज्या राज्यात आहे, तिथे तिथे जणू धरून मारतात अशी स्थिती आहे, त्यामुळे तिथल्या तिथल्या मुख्यमंत्री नी दिल्लीला जाऊन भेट घेतली पाहिजे. सध्या जे राजकारण सुरू आहे, ते कोणाला अभिप्रेत नाही, सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे कळते असेही ते यावेळी म्हणाले.

छगन भुजबळ पुढे म्हणाले कि, सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे असे कळते, मात्र सरकारी पक्षाच्या लोकांवर करावाई करून ईडी आणि इतर चौकशी लावतात ते योग्य नाही, सरकारी यंत्रणांनी कोणत्याही दबावाखाली येऊन काम करू नये, भाजपमधील नेत्यांवर करावाई का होत नाही? असा सवाल त्यांनी यावेळी केला. त्यामुळे काचेच्या घरात राहण्यानी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये, आरोप झाले तर प्रत्यारोप होणारच..! यंत्रणा काम करतील तुम्हाला मध्ये जायचे, प्रसिद्धीसाठी काही काम करायचे, गरज नाही, भाषा प्रत्येकाने संयमाने वापरायला पाहिजे मात्र राग आणि ताप वाढला की अनावर होतो आणि यातून हे भाषा पुढे येते!

तर किरीट सोमय्यांविषयी बोलताना ते म्हणाले कि, त्यांना पोलिसांची नोटीस प्राप्त झालीय, मात्र कोविड काळात गर्दी जमवू नये, नियमांचा भंग झाला म्हणून नोटीस बजावली आहे, किरीट सोमय्या यासारख्या मोठ्या नेत्यांची काळजी पोलीस आणि सरकारला आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा असे करू नये, म्हणून नोटिस बजावली आहे, आम्ही कोणाला तक्रार केली नसल्याचे त्यांनी सांगितले.