धक्कादायक! जिल्ह्यात एकाच दिवशी आठ जणांनी आयुष्य संपवलं!

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकसह जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यात एकाच दिवशी आठ जणांनी आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनांमध्ये तरुण तरुणींचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

नाशिक शहरातील विविध भागातील पाच जणांनी आत्महत्या केली असून जिल्ह्यातील ३ जणांनी आपले जीवन संपवले आहे. यातील तिघेजण २५ च्या आतील असून तिघेजण ३५ च्या आतील वयाचे आहेत. एकाच दिवशी आठ जणांनी आत्महत्या केल्याने जिल्हा हादरला आहे.

इंदिरानगर येथील भाग्यश्री सागर उफाडे (वय, २१) घराच्या हॉलमध्ये सिलींग फॅनला सुताच्या दोरीने बांधुन गळफास घेऊन आत्महत्या केली. तर सातपूर येथील मनोज अशोक मोरे (वय, २८) या तरुणानं शालीने घराच्या हॉलमध्ये फॅनच्या हुकला गळफास घेत आत्महत्या केली आहे.

तर अंबड येथील परशुराम लक्ष्मुण पवार (वय २३) याने राहत्या घरी काहीतरी विषारी औषध सेवन करत आपलं जीवन संपवलं. तर मोरवाडी, सिडको येथील बाळु आबाजी आहीरे (वय ४६) घरी हॉलमध्ये सिलींग फॅनला स्कार्पच्या साहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली. तर गंगापूर येथील शितल अनिल शेवरे, (वय-१८) वर्षीय तरुणीने घराचे शेडच्या बल्लीला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

तर जिल्ह्यातील घटनांमध्ये सिन्नर तालुक्यातील शहापूर येथील गणेश इंद्रभान गुरुळे (वय ३७) घराच्या आड्याला गळफास घेत जीवन संपवलं आहे. तर सटाणा तालुक्यातील ठेगोंडा येथील सागर जिभाऊ जाधव (वय ३३) सिलिंग फॅनच्या कडीला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. तर दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील गणेश लहानू फडोळ (वय, ३२) याने आत्महत्या केली आहे.

जिल्ह्यात एकाच वेळी आठ आत्महत्येच्या घटना समोर आल्याने आता चिंता व्यक्त केली जात आहे. साध्या-साध्या घटनांमुळे व्यक्ती आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत असल्याने समाजाला खऱ्या अर्थाने प्रबोधनाची गरज असल्याचं समोर येत आहे. कोणत्याही समस्येवर आत्महत्या हे उत्तर असू शकत नाही. त्यामुळे अशा घटनांना आळा बसावा यासाठी आता पोलिसांसह प्रशासनाला देखील योग्य ती पावलं उचलावी लागतील तरच या घटना आटोक्यात येतील.