संदीप वाजे म्हणतो, हवं तर माझी नार्को टेस्ट करा !

नाशिक । प्रतिनिधी

बहुचर्चित डॉ. सुवर्णा वाजे खून प्रकरणातील मुख्य संशयित वाजे याने न्यायालयात मी गुन्हा केला असेल तर माझी नार्को टेस्ट करा, अशी मागणी केल्याचे त्याच्या वकिलांनी पत्रकारांशी बोलताना सांगतिले आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे हत्या प्रकरणात त्यांचे पती संदीप वाजे यांना नाशिक नाशिक ग्रामीण पोलिसांनी संशयित म्हणून अटक केली होती. मात्र संदीप वाजे १३ दिवस पोलीस कोठडीत असताना नाशिक गरमीने पोलिसांनी नायायालयात एकही ठोस पुरावा सादर न केल्याने संदीप वाजे यास इगतपुरी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मनपाच्या वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाजे हत्याकांडात मुख्य संशयित म्हणून पोलिसांनी अटक केलेला त्यांचा पती संदीप वाजे यास बुधवारी (दि.१६) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान वाडीवऱ्हे पोलिसांनी संदीपचा मावसभाऊ व जवळचा मित्र बाळासाहेब उर्फ यशवंत रामचंद्र मस्के यास प्राप्त पुराव्यांच्या आधारे बुधवारी अटक केली.

दरम्यान पोलिसांना वाजेच्या दोन मित्रांवर संशय होता. यापैकी मस्केविरुद्ध प्राप्त पुराव्यांवरून पोलिसांनी सुर्वणा वाजे खून प्रकरणात सहभागी असल्याच्या संशयावरून अटक केली. मस्के यास गुरुवारी म्हणजेच त्यास इगतपुरी न्यायालयात हजार केले जाणार आहे. त्यामुळे मस्केच्या बाबत न्यायालयात काय सुनावणी होते याकडे लक्ष लागले आहे.