Home » शेर शिवराज है! नाशिकमध्ये शिवजन्मोत्सवाची जय्यत तयारी

शेर शिवराज है! नाशिकमध्ये शिवजन्मोत्सवाची जय्यत तयारी

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी
कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊन पुन्हा कोरोना वाढणार नाही यासाठी शासनाने दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करावे असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शहरातील शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांना केले.

नाशिक शहरातील विविध विभागातील शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज पालकमंत्री छगन भुजबळ यांची भुजबळ फार्म येतील कार्यालयात भेट घेतली. यावेळी आयोजित बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, शिवजन्मोत्सव हा सर्वांचा उत्सव असून हा उत्सव साजरा करतांना समाजात आनंद कसा वाढेल यावर भर देण्यात यावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्यात यावे. शिवजयंती उत्सव साजरा करतांना कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे. प्रशासन व यंत्रणेला सर्वांना सहकार्य करण्यात यावे. अतिउत्साहाच्या भरात उत्सवाला कुठलही गालबोट लागत कामा नये. हा सर्व उत्सव शांततेच्या मार्गाने पार पडेल यासाठी सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन करत सर्वांना शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी शिवजन्मोत्सव समित्यांच्या असलेल्या विविध अडचणी समजून घेत अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याचे निरासन केले.

यावेळी शहरातील विविध शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांचा सत्कार करून त्यांना शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी शहरात विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमाबाबत माहिती दिली.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!