Home » लाच घेताना महिला ग्रामसेविका अँटी करप्शनच्या जाळ्यात

लाच घेताना महिला ग्रामसेविका अँटी करप्शनच्या जाळ्यात

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

चांदवड तालुक्यातील कटारवाडी येथील ग्रामसेविकाला अवघ्या ९०० रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने पकडले आहे.

शेतकऱ्यांना दरमहा मिळणारे शासकीय अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी या ग्रामसेविकेने संबंधित शेतकऱ्याकडून १००० रुपयांची लाचेची मागणी केली होती. दरम्यान तडजोडीअंती ९०० रुपये देण्याचे ठरले.

त्यानंतर फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. सानप कॉम्प्लेक्स येथील टी स्टॉलवर ९०० रुपयांची लाच स्वीकारताना पथकातील पोलिस निरीक्षक साधना इंगळे, हवालदार सचिन गोसावी, पोलिस नाईक अजय गरुड, राजेंद्र गिते, अशोक धामंदे यांनी कुटेमाटे यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शेतात उभे असलेले पीक पूर्ण उद्‌ध्वस्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना शासनाकडून दिली जात असताना अशा पद्धतीने शेतकऱ्यांकडून पैसे उकळले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पदोपदी मरण सोसावे लागत असल्याचे या घटनेवरून दिसून येते.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!