शनिवार, जून 3, 2023
घरताज्या बातम्यानाशिक पोलिसांकडून एमआयएम कार्यकर्त्यांची धरपकड

नाशिक पोलिसांकडून एमआयएम कार्यकर्त्यांची धरपकड

नाशिक । प्रतिनिधी

तिरंगा यात्रेसाठी मुंबईला निघालेल्या एमआयएम कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे. हे कार्यकर्ते जुन्या नाशकातून तिरंगा यात्रेसाठी निघाले होते.

दरम्यान मुस्लीम आरक्षण आणि इतर मुद्द्यांवर खासदार इम्तियाज जलील यांनी तिरंगा यात्रेची हाक दिली होती. या हाकेला साद देत नाशिकवरून मोठ्या प्रमाणात एमआयएमचे कार्यकर्ते तिरंगा यात्रेला निघाले होते. मात्र नाशिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी विविध वाहनांमधून निघालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी थांबवत अनेकांना ताब्यात घेतले.

तसेचग मालेगावमध्ये देखील तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. यावेळी यात्रा सुरु असताना पोलिसांनी काही कार्यकर्त्याना स्थानबद्ध केले. यामध्ये उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. खालिद परवेज यांच्यासह कार्यकर्त्यांनां त्यांच्याच फार्महाऊसवर स्थानबद्ध केले आहे. यात्रेत सहभागी होण्यासाठी आलेले मोर्चेकरी मात्र यात्रेत सहभागी होण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे दिसून आले.

मुस्लीम आरक्षणआणि वक्फ बोर्डच्या प्रश्नावर एमआयएमची तिरंगा यात्रा मुंबईत होणार असून राज्यातील अनेक भागातून कार्यकर्ते या यात्रेत सहभागी होणार आहेत.

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप