गोदेचा प्रवास सुकर करण्यासाठी ‘नदी महोत्सव’

नाशिक । प्रतिनिधी

गोदावरीच्या विकासासाठी तसेच पुनर्वैभवासाठी नदीमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ डिसेंबर ते २१ डिसेंबर या दरम्यान नदी महोत्सव साजरा केला जाणार आहे.

गोदावरीला प्रदूषणाच्या विळख्यातुन मुक्त करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, संघटना, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कार्य करत आहेत. तरीही हवे तेवढे यश अजून आले नाही. गोदावरी नदीचे पावित्र्य राखण्यासाठी व गोदावरीला प्रदूषणाच्या विळख्यातुन मुक्त करण्यासाठी नाशिककरांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासन राज्य पुरातत्त्व विभाग व नासिक इतिहास संशोधन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नदी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान सह दिवसांत वारसा फेरी आणि विविध व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. विविध मान्यवरांना यासाठी निमंत्रित करण्यात आले असून नासिक सराफ बाजार येथील सरकारवाडा येथील दरबार हॉलमध्ये आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवातील कार्यक्रमांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे;
बुधवार, १५ डिसेंबर २०२१, सकाळी : ७.३० वाजता.
गोदेची वारसा फेरी : संयोजन व मार्गदर्शन : श्री. देवांग जानी व रमेश पडवळ
प्रमुख उपस्थिती : श्री. सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नासिक
ठिकाण : देवमामलेदार महाराज मंदिर, रामकुंडासमोर, गोदाघाट

गुरुवार, १६ डिसेंबर २०२१, सायं : ५.३० ते ७.००
व्याख्यान: नदी संस्कृती : डॉ. प्राजक्ता बस्ते, नदीच्या अभ्यासक व तज्ज्ञ
ठिकाण : दरबार हॉल, सरकारवाडा, सराफ बाजार, नासिक

शुक्रवार, १७ डिसेंबर २०२१, सायं : ५.३० ते ७.००
व्याख्यान : गोदाघाटावरचे नाशिक : डॉ. कैलास कमोद.
ठिकाण : दरबार हॉल, सरकारवाडा, सराफ बाजार, नासिक

शनिवार, १८ डिसेंबर २०२१
सकाळी : ७.०० वाजता : गोदाकाठचे पक्षी जीवन : संयोजन व मार्गदर्शन : प्रा. आनंद बोरा
ठिकाण : गाडगे महाराज धर्मशाळा, गोदाघाट
सायं : ५.३० ते ७.०० : व्याख्यान : जल प्रदूषण : डॉ. व्ही. बी. गायकवाड
ठिकाण : दरबार हॉल, सरकारवाडा, सराफ बाजार, नासिक

रविवार, १९ डिसेंबर २०२१, सायं : ५.३० ते ७.००
व्याख्यान : प्राचीन नाण्यांमधील नदी : श्री चेतन राजापुरकर
ठिकाण : दरबार हॉल, सरकारवाडा, सराफ बाजार, नासिक

सोमवार, २० डिसेंबर २०२१, सायं : ५.३० ते ७.००
व्याख्यान : नासिकची गोदावरी : डॉ. शिल्पा डहाके, गोदावरी अभ्यासक व तज्ज्ञ
ठिकाण : दरबार हॉल, सरकारवाडा, सराफ बाजार, नासिक

मंगळवार, २१ डिसेंबर २०२१, ५.३० ते ७.००
व्याख्यान : ऊर्ध्व गोदावरी नदीवरील आधुनिक पूर : कारणे आणि परिणाम : प्रा. डॉ. प्रमोद हिरे.
ठिकाण : दरबार हॉल, सरकारवाडा, सराफ बाजार, नासिक