वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून फादरचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक | प्रतिनिधी

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून एका चर्चच्या फादरला आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलावे लागल्याची धक्कादायक घटना नाशकात घडली आहे. सुदैवाने यात फादरचे प्राण वाचले आहेत.

नाशिकच्या शालिमार येथील सेंट थॉमस चर्च मध्ये ही घटना घडली आहे. या चर्चमध्ये फादरने स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. बिशप शरद गायकवाड यांच्या समोर फादर अनंत आपटे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. बिशप गायकवाड यांच्या जाचाला कंटाळूनच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फादर अनंत आपटे यांनी केला आहे. मात्र पहिल्यांदाच अशी घटना चर्च मध्य घडल्याने खळबळ उडाली आहे.

फादर अनंत आपटे यांनी स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी शेजारी प्रार्थना करत असलेल्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला.

दरम्यान वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून घटनेनंतर फादर आपटे यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.