Home » थंडीचा कहर, निफाडचा पारा घसरला!

थंडीचा कहर, निफाडचा पारा घसरला!

by नाशिक तक
0 comment

नाशिक | प्रतिनिधी
दोन तीन दिवसांतील वातावरण बदलांमुळे जिल्ह्यातील हुडहुडीत वाढ झाली असून नाशिक शहरात थंडीने कहर केला आहे.

यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिक शहरात तापमानाची नोंद ७.३ अंश सेल्सीअस इतकी झाली आहे. तर निफाडचा पारा ०६ अशांवर आला आहे. त्यामुळे या सलग घसरत असलेल्या पार्‍यामुळे शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडली आहे.

दरम्यान रविवारी (दि. ०९) रोजी कमी तापमानाची नोंद झाली होती. परंतु आज पुन्हा तापमान घसरले असून नाशिकमध्ये ७.३ अंशावर आले तर तर निफाडचे तापमान ०६ अंशावर आले आहे. सगळीकडे शेकोट्या पेटलेल्या दिसून येत असून सायंकाळी पाच नंतर घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. तर सकाळची सुरवात आठ नंतर होतांना दिसून येत आहे.

मागील काही दिवसांत जिल्ह्यातील अनेक भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून हेच वातावरण असल्याने आलेल्या शितलहरीचा परिणाम जाणवत आहे. यामुळे जिल्हाभर थंडीचा प्रकोप जाणवू लागला आहे.

या घसरलेल्या तापमानाचा फटका जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांना बसत आहे. थंडीचा पिकांवर परिणाम तापमानात अचानक घट झाल्याने द्राक्ष पिकासह कांदे, हरभरा, गहू उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!