नाशिक | प्रतिनिधी
देशात कोरोनाच्या ओमायक्रॉनमुळे व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्येत झपाट्याने वाढत होत आहे. कोरोनाची तिसरी लाट देशात धडकली असून सरकारकडून निर्बंधासारखे पाऊले उचलण्यात आली आहे. आजपासून आरोग्य कर्मचारी आणि ६० पेक्षा अधिक वयोगटातील लोकांना कोरोना लसीचा तिसरा डोस देण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर आजपासून नाशिक शहरात देखील बूस्टर डोस मिळणार आहेत. यामध्ये आरोग्य विभागातील कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर आणि ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांना हा बूस्टर डोस मिळणार आहे.
नाशिक मनपा प्रशासनाने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी केली असून शहरातील १३८ केंद्रावर हा बूस्टर डोस उपलब्ध करून देण्यात आला आहे. दरम्यान ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील त्यांनाच बूस्टर डोस दिला जाणार आहे. म्हणजे जर तुम्ही कोविशील्डचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर तुम्हाला बूस्टर डोसही कोविशील्ड लसीचा घ्यावा लागेल.
विशेष म्हणजे या बूस्टर डोस साठी पुन्हा रजिस्ट्रेशन करावं लागण्याची गरज नाही. यामध्ये दोन पर्याय असून सुरुवातीला ते कोविन अँप वर जाऊन वेळ घेऊ शकतात. दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही थेट लसीकरण केंद्रावर जात लसीकरण करुन घेऊ शकता.
सदर बुस्टर डोस साठी लसीचा दुसरा डोस ९ महिन्यापूर्वी घेतला असणे आवश्यक आहे. तर तिसऱ्या डोससाठी नोंदणी करु शकता. जर दुसरा डोस घेऊन ९ महिन्यापेक्षा कमी कालावधी झाला असेल तर बूस्टर डोससाठी वाट पाहावी लागणार आहे.