नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा ३२ कोटींचा निधी, पहा कोणत्या तालुक्याला किती?

नाशिक । प्रतिनिधी

ऑगस्ट- सप्टेंबर २०२१ मध्ये नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३२ कोटी २९ लक्ष रुपयांची नुकसान भरपाई मदत प्राप्त झाली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झाल्यानंतर राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे विविध ठिकाणी नुकसानीची पाहणी करून अधिकाऱ्यांना तातडीने पंचमाने करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त एकूण ८ तालुक्यातील शेतकऱ्यांना ३२ कोटी २९ लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यामध्ये येवला तालुक्याला १५ कोटी २४ लक्ष, नांदगाव तालुक्याला १५ कोटी ७४ लक्ष, देवळा तालुक्याला ८३ हजार, सुरगाणा तालुक्याला ४ लक्ष ५६ हजार, त्र्यंबकेश्वर तालुक्याला ९५ हजार, इगतपुरी तालुक्याला ३ लक्ष १७ हजार, पेठ तालुक्याला ३ लक्ष ७१ हजार तर निफाड तालुक्याला १ कोटी १७ लक्ष रुपये असा एकूण नाशिक जिल्ह्यातील ८ नुकसानग्रस्त तालुक्यांना ३२ कोटी २९ लक्ष निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.