नाशिक । प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. रामप्रसाद पाटील (३२) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
एकीकडे नुकताच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला असताना अशा परिस्थितीच द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याची फसवणूक चर्चेचा विषय झाला आहे. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील शेतकरी पाटील यांनी आपल्या बागा उभ्या केल्या होत्या. खरेदीसाठी निफाड येथील व्यापारी समाधान शेळके यासोबत व्यवहार झाला.
सदर व्यापाऱ्याने द्राक्षमाल खरेदी करून त्यांना खोटा चेक देऊन त्यांचा विश्वास संपादन करून द्राक्षमाल खरेदीचे एकूण ५ लाख २० हजार घेतले. मात्र शेतकरी पाटील यांच्या लक्षात हि बाब येताच त्यांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. या प्रकरणी शेळके यांच्याविरुद्ध मालेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी घ्या काळजी
शेतीमालाच्या उत्पादकतेपेक्षा बाजारातील दराला अधिकचे महत्व आहे. येथील व्यवहारावरच शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत कामी येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांशी व्यवहार करताना तोंडी नाही तर लेखी व्यवहार करणे गरजेचे आहे. यामध्ये द्राक्ष मालाचा दर, वाण याचा उल्लेख होणे गरजेचे आहे. शिवाय व्यापाऱ्याचा प्रतिनीधी किंवा निर्यातदाराचा प्रतिनीधी यांचे नाव, आधारकार्ड, मोबाईल नंबर याची अचूक नोंद घ्यावी लागणार आहे.