नाशिक | प्रतिनिधी
देवळा येथे प्रेमप्रकरणातून एका युवकाला जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना काल उघडकीस आली. या घटनेतील जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
देवळा तालुक्यातील लोहोणेर येथे काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली. भरवस्तीत मुलीकडच्या लोकांनी पीडित तरुणास मारहाण करून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी काल उशिरा देवळा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला.
दरम्यान घटनेनंतर तात्काळ या युवकास नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता या तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याची मिळते आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हा तरुण ८० टक्के भाजला आहे. दरम्यान जळीत कांड प्रकरणी पोलिसांनी मुलीसह आई वडील आणि भाऊ यांना अटक केली आहे. पुढील तपास देवळा पोलीस करत आहेत.