शनिवार, जून 3, 2023
घरक्राइमसंशयित आरोपी वाजे यास पाच दिवसांचा पीसीआर

संशयित आरोपी वाजे यास पाच दिवसांचा पीसीआर

नाशिक | प्रतिनिधी
नाशिकमधील बहुचर्चित डॉ. वाजे खून प्रकरणी संशयित आरोपी संदीप वाजे यास न्यायालयात हजर केले असता त्यास पाच दिवसांचा पीसीआर देण्यात आला आहे.

नाशिकमध्ये डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हत्याकांडमध्ये पोलिसांनी या घटनेतील मयत सुवर्णा वाजे याचा पती संदीप वाजे याला मुख्य संशयित आरोपी म्हणून नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आज त्याला माननीय न्यायालयासमोर पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाकडून संदीप वाजे याला आणखी पाच दिवसाचा पीसीआर देण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे. सदर घटनेतील पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाब नुसार नाशिक ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करणार असून लवकरच या प्रकरणाचा तपास लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप