नाशिकच्या शुभम पार्कमध्ये धुडगूस घालणाऱ्या गुंडांची काढली धिंड

नाशिक | प्रतिनिधी
सिडकाेतील शुभम पार्क परिसरात मद्यधुंद अवस्थेत वाहनांची व दुकानाची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या चार गुंडांची अंबड पाेलिसांनी शुभम पार्क परिसरातून धिंड काढली. 

नवीन नाशिक शुभम पार्क परिसरात मधधुंद अवस्थेत वाहनांची तोडफोड करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक  केलेली आहे.अटक केलेल्या आरोपीचे नाव वैभव रणजित लोखंडे, वैभव गजानन खिरकाडे, अविनाश शिवाजी गायकवाड , केतन गणेश भावसार यांच्यासह एका अल्पवयीन मुकाच्या यामध्ये समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी शहरातील शुभम पार्क परिसरामध्ये कोयत्याच्या जाेरावर धुमाकूळ घालत चार चाकी वाहनांच्या काचा फोडल्या होत्या. तसेच नगरसेविका छाया देवांग यांच्या दुकानाच्या बाहेर असलेल्या पाणीपुरीच्या गाडीच्या देखील काचा फोडल्या होत्या. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान यातील अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. यातील चार संशयितांची परिसरात दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी त्यांना शुभम पार्क व ज्या परिसरामध्ये त्यांनी गाड्यांची तोडफोड व दुकानाचे नुकसान केले होते, त्या परिसरातून फिरवत धिंड काढली.

एकूणच पोलिसांनी आता संशयित आरोपींच्या विरोधात मोका अंतर्गत कारवाईला सुरवात केली आहे. जेणेकरून इतर गुन्हेगारांवर त्याची वचक बसणार आहे.