नाशिक मनपाच्या ऑनलाइन महासभेत पुन्हा गोंधळ

नाशिक | प्रतिनिधी
नाशिकच्या महापालिकेतील ऑनलाईन महासभेत पुन्हा गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. महापालिकेच्या महत्त्वपूर्ण विषयांसाठी बोलवण्यात आलेल्या ऑनलाईन महासभेत कॉम्प्युटर काढण्यात आल्याने विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात जाऊन गोंधळ घातला.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महापालिकेची ऑनलाईन महासभा बोलावण्यात आली होती. यावेळी ऑनलाइन महासभेत पुन्हा गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. ऑनलाइन सभा असूनही प्रत्येक गटनेता कार्यायातील संगणक काढून नेल्याने शिवसेना आक्रमक झाल्याने गोंधळ निर्माण झाला.

ऑनलाईन सभा असतांना गटनेता कार्यालयातील संगणक काढून नेल्याने कार्यलयातील संगणक का काढले? असा संतप्त सवाल महापौरांना करण्यात आला. यावेळी शिवसेना गटनेता आणि नगरसेवकांनी रामायण वर गोंधळ घालत संबंधीत लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मात्र या घटनेनंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली असून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.