Home » गोदापात्रात वादग्रस्त बांधकाम, महापौरांचे कारवाईचे आदेश

गोदापात्रात वादग्रस्त बांधकाम, महापौरांचे कारवाईचे आदेश

by नाशिक तक
0 comment

नाशिक | प्रतिनिधी

शहरातील आंनदवल्ली शिवारातील नवश्या गणपती येथील नदीपात्राला लागून सुरू असलेल्या वादग्रस्त बांधकामाची शुक्रवारी महापौरांसह शिवसेना व मनसेच्या नगरसेवकांनी एकत्रीत पाहणी केली.

या दौऱ्यानंतर नदीपात्रालगत सुरू असलेल्या बांधकाम नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचे महापौरांनी मान्य केले असले तरी डीएलआर नुसार सर्वेक्षण केल्यानंतर संबंधित विकसकांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

नदीपात्रालगत गेल्या अनेक दिवसांपासून अनधिकृत बांधकाम होत असल्याची तक्रार नगरसेवकांच्या माध्यमातून नगररचना विभागाकडे केली जात होती. या वादग्रस्त बांधकामाबाबत महापौर आणि नगरसेवक आक्रमक झाले होते. त्याचबरोबर महासभेत देखील हा विषय लावून धरला होता. नगरसेवकांच्या तक्रारीत तथ्य असल्याने महापौरांसह नगरसेवकांनी या बांधकामाची पाहणी केली.

याबाबत नगरसेवकांनी वारंवार पाठपुरावा करून काही पुरावे सादर केल्याने अखेर महापौरांनी या बांधकामाची पाहणी करत तात्काळ कारवाई करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!