Home » नाशिकमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरूच, आज ‘इतके’ पॉझिटिव्ह

नाशिकमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरूच, आज ‘इतके’ पॉझिटिव्ह

by नाशिक तक
0 comment

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात (Nashik District) कोरोना रुग्णांचा (Corona Patient’s) उद्रेक झाला असून काल जिल्ह्यात दिवसभरात १७०२ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( Corona reports Positive) आल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त (Nashik Administration) अहवालानुसार मागील चोवीस तासात १७०२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) शहरात १२२२, नाशिक ग्रामीण विभागात ३३९, मालेगाव ५१, तर जिल्हाबाह्य ९० अशी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

आजच्या पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत काहीशी घट झाली असली तरी दिवसभरात जिल्ह्यात ०२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मृत्यूचा आकडा हा ८ हजार ७७० वर आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. परिस्थिती अशीच राहिली तर कठोर निर्बंध लावण्याचा इशारा तसेच जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिला आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!