Home » नाशिककर ! पाणी भरून ठेवा, ‘या’ दिवशी पाणीबाणी

नाशिककर ! पाणी भरून ठेवा, ‘या’ दिवशी पाणीबाणी

by नाशिक तक
0 comment

नाशिक | प्रतिनिधी

शहरातील गंगापूर धरण परिसरात करण्यात येत असलेल्या तांत्रिक कामामुळे गुरुवारी सकाळी ०९ ते सायंकाळी पाच या वेळेत शहरातील काही भागांत विद्युतपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. परिणामी शहरातील काही भागांत पाणीपुरवठा होणार नाही. नागरिकांनी महापालिके ला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक मनपाच्या गंगापुर धरण पंपिंग पंपिंग स्टेशन येथील मिटरींग क्युबिकल, एचटी व एलटी ट्रान्सफॉर्मर इनकमिंग आऊटगोईंग सप्लाय किट व सबस्टेशन पॅनल रुममधील फिडरचे इनकमिंग आऊटगोईंग सप्लाय किट, वीज वितरण कंपनी बाजुकडील सिक्स पोल स्ट्रक्चरवरील ३३ के.व्ही. इनकमिंग व आऊटगोईंग जंपर दुरुस्ती करण्यात येणार आहे.

तसेच मुकणे धरण विल्होळी जलशुध्दीकरण केंद्रातुन जाणारी मुख्य पाईप लाईन दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने सदर दुरुस्ती कामासाठी गुरुवार दि. २० रोजी सकाळी ०९ वाजेपासून ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत एकुण ८ तास वीज बंद असणार आहे.

तर मनपाचे गंगापुर धरण रॉ.वॉटर पंपिंग स्टेशन व मुकणे धरण रॉ.वॉटर पंपिंग स्टेशन येथून शहरास होणारा रॉ.वॉटर पाणी पुरवठा बंद ठेवावा लागणार असल्याने संपुर्ण शहराचा गुरुवार (दि.२०) रोजीचा सकाळचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही.

तसेच शुक्रवारी (दि.२१) रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे ही विनंती.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!