नाशिककर हलक्यात घेऊ नका ! चार पटीच्या वेगाने वाढतोय कोरोना

नाशिक | प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे पाचशे हुन अधिक नव्या रुग्णांची नोंद होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. ॲक्टिव पेशंटची संख्या देखील हजारच्या वर गेल्याने प्रशासनाने आता तिसऱ्या लाटेची जोरदार तयारी सुरू केली आहे.

गेल्या काही दिवसांत नाशिक जिल्ह्यात सातत्याने कोरोनाचा रुग्णांचा आलेख वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. दरम्यान नाशिक मध्ये १३ हजाराच्या आसपास बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. यात ऑक्सिजनचे ०४ हजार ९३६ बेड, व्हेंटिलेटर चे १२१९ बेड तर आयसीयुचे १००४ बेडची सज्जता ठेवली आहे.

नाहीक जिल्ह्यात सध्या एकूण १४३ रुग्ण दाखल असून यात ऑक्सिजन बेड वर ५४ रुग्ण तर व्हेंटिलेटरवर ११ रुग्ण असल्याची प्रशासनाकडून मिळाली आहे. तर ४०० ते ५०० टन ऑक्सिजनची उपलब्धता करून देण्यात आली आहे. तर काही खासगी हॉस्पिटल अधिग्रहण करण्याचा काम सुरू करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांना बरोबरच वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर देखील पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनाचा वाढता आलेख असाच सुरू राहिला तर अजून कडक निर्बंध लावण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

अशी आहे आजपर्यंतची आकडेवारी

आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण – १३८
आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ : ८३७ नाशिक मनपा – ६२२
नाशिक ग्रामीण – १७३
मालेगाव मनपा – ००५
जिल्हा बाह्य- ०३७

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ८७६३

पहा मागील सात दिवसांची आकडेवारी

०१ जानेवारी १२२
०२ जानेवारी ११७
०३ जानेवारी २१६
०४ जानेवारी ३२२
०५ जानेवारी ५०८
०६ जानेवारी ५३८
०७ जानेवारी ८३७