Home » मालेगांव दंगल प्रकरण : नगरसेवक मुस्तकीम डिग्नेटी पोलिसांना शरण

मालेगांव दंगल प्रकरण : नगरसेवक मुस्तकीम डिग्नेटी पोलिसांना शरण

by नाशिक तक
0 comment

नाशिक | प्रतिनिधी

नोव्हेंबर महिन्यात मालेगाव शहरात झलेल्या दंगली प्रकरणी जनता दलाचे नगरसेवक मुस्तकीम डिग्नेटी पोलिसांना शरण आले आहेत. दंगलीनंतर ते भूमिगत झाले होते.

मालेगाव बंद दरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी अद्यापपर्यंत ४२ जणांना अटक करण्यात आली होती. मात्र या प्रकरणातील अनेकजण फरार होते. मालेगाव पोलीस या सर्वांचा शोध घेत असताना आज जनता दलाचे नगरसेवक मुस्तकीम डिग्नेटी पोलिसांना शरण आले आहेत.

मागील नोव्हेंबर महिन्यात मालेगावात बंद पुकारण्यात आला होता. यावेळी बसस्थानकावर दगडफेक, व्यापारी संकुलाची तोडफोड, प्राणघातक हल्ले, दुकानांना आग लावण्याचे प्रकार घडले होते. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ व्हायरल करत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यामध्ये राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी यांना अटक करण्यात आली होती. तर काही जण भूमिगत झाले होते. यातील अनेकांना अटकही करण्यात आली होती.

या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी कठोर भूमिका घेत अटक सत्र सुरू केले होते. यामध्ये डिग्नेटी यांच्यावर मालेगाव दंगलीचा आरोप होता. मात्र ते महिना भरापासून फरार असल्याने पोलिस शोध घेत होते. अखेर आज डिग्नेटी स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाले आहेत. डिग्नेटी हे दिवंगत माजी मंत्री निहाल अहमद याचे जावई असल्याची माहिती आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!