कळवण तालुक्यातील काठरे दिगर येथील आदिवासी उत्सवात नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी आदिवासी नृत्यावर ठेका धरला.
आदिवासी भागात दरवर्षी मोठ्या उत्साहात डोंगऱ्या देवाचा उत्सव साजरा केला जातो. यंदाही कळवण तालुक्यातील काठरे दिगर येथे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी आदिवासी बांधवांसोबत आदिवासी तारपा नृत्यावर ठेका धरला.
या कार्यक्रमात आमदार नितीन पवार हे देखील उपस्थित होते. यावेळी आमदार पवार यांनी पांडेय यांच्यासह आदिवासी नृत्याचा आनंद घेतला.
आदिवासी भागात डोंगऱ्या देव उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.