नाशिक । प्रतिनिधी
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर विद्यापीठ कायद्याच्या निषेधार्थ भाजपा युवती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी काळी रांगोळी काढून पहाटेच्या वेळी निषेध व्यक्त केला होता. हा निषेध नोंदवणे पदाधिकार्यांना चांगलेच महागात पडले आहे.
राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घ्यावी, यासाठी आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणुन भारतीय जनता युवा मोर्चा युवती विभाग नाशिक महानगराच्या वतीने नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्म निवासस्थानाबाहेर निषेधाची काळी रांगोळी काढण्यात आली होती. मात्र हा निषेध चांगलाच महागात पडला असून या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये महानगर सरचिटणीस ऋषिकेश आहेर, युवती शहराध्यक्ष साक्षी दिंडोरकर, संदीप दिंडोरकर, यांच्यासह मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यापीठ बचाव आंदोलन जाहीर निषेध करत हे विधेयक मागे घ्यावे याकरिता भारतीय जनता युवा मोर्चा कडून विद्यापीठ बचाव आंदोलन करत या घटनेचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वपोनि भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.