Home » मोठी बातमी ! नाशकात ओमीक्रॉंनचा धोका? ‘हे’ आहे कारण

मोठी बातमी ! नाशकात ओमीक्रॉंनचा धोका? ‘हे’ आहे कारण

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

अद्याप सातासमुद्रापार असलेल्या ओमिक्रोनने नाशिक शहराचे टेन्शन वाढविले आहे. कारण काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत आयोजित आयर्नमॅन या स्पर्धेसाठी नाशिकहून दोन जण सहभागी झाले होते. यामुळे नाशकात ओमिक्रॉनचा धोका वाढला आहे.

दरम्यान दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे. यामुळे जगभरात भीतीचे वातावरण असताना नाशिकमधून हा डोकेदुखी वाढविणारा प्रकार समोर आला आहे. दक्षिण आफ्रिकेत दरवर्षी एप्रिल महिन्यात आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन हि स्पर्धा आयोजित केली जाते. मात्र एप्रिलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने हि सस्पर्धा नोव्हेबरमध्ये आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत नाशिकमधून दोन खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यातील एकाने हि स्पर्धा देखील जिंकली. त्यानंतर हे दोघेही चार दिवसापूर्वी नाशकात परतले आहेत. मात्र नुकताच आलेला नवा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेतच आढळलल्याने नाशिकची चिंता वाढली आहे.

तर स्पर्धेसाठी गेलेल्या दोघांचे स्वाब महापालिकेकडून तपासणीसाठी घेतले असून दोघा खेळाडूंना संस्थात्मक अलगीकरन केले आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!