मराठी साहित्य संमेलनात”नो व्हॅक्सीन,नो एंट्री”-सुरज मांढरे,जिल्हाधिकारी

नाशिक | प्रतिनिधी

“ओमीक्रॉन” या कोरोनाच्या नव्या व्हेरियंट च्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये होऊ घातलेल्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात “नो व्हॅक्सीन नो एन्ट्री ” असा निर्णय आता जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्यावतीने घेण्यात आला आहे.त्यामुळे आता संमेलनात येणाऱ्यांचे लसीकरण झालेलं अनिवार्य असणार आहे.ज्यांचे लसीकरण झालेले नाही अश्यांना आता या होऊ घातलेल्या साहित्य संमेलनात एन्ट्री दिली जाणार नाहीये.


खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने देखील आता कडक पाऊले उचलली आहे.संमेलनाच्या ठिकाणीच महापालिकेच्या वतीने येणाऱ्या नागरिकांची कोरोनाच्या अनुषंगाने तपासणी केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे.त्यामुळे मागील कोरोनाच्या दोन लाटांमुळे आधीच पुढे ढकलून येत्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ घातलेल्या ९४ व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर पुन्हा एकदा कोरोनाचे सावट पसरले आहे.