शनिवार, जून 3, 2023
घरताज्या बातम्यादिलासादायक ! नाशिकमधील 'त्या' खेळाडूंचे अहवाल निगेटिव्ह

दिलासादायक ! नाशिकमधील ‘त्या’ खेळाडूंचे अहवाल निगेटिव्ह

नाशिक । प्रतिनिधी

दक्षिण आफ़्रिएकेतून आयर्नमॅन सहभागी होऊन नाशकात परतलेल्या त्या दोन खेळाडूंचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे नाशिक प्रशासनासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

चार दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत आयोजित केलेल्या आयर्नमॅन या स्पर्धेसाठी नाशिकमधून दोघांनी सहभाग घेतला होता. हि स्पर्धा आटोपल्यानंतर ते नाशिकमध्ये परतले. मात्र त्यांनतर काही दिवसांतच दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याने खळबळ उडाली. नाशिक प्रशासनाने तातडीने सहभागी झालेल्या खेळाडूंचे स्वब घेतले. आणि त्यांना संस्थात्मक अलगीकरण केले. कल उशिरा या चाचणीचा अहवाल मनपास प्राप्त झाला. यानुसार या दोन्ही खेळाडूंचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा निस्वास टाकला.

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे. त्या पार्श्वभूमीवर जगभरात सतर्कतेचे आवाहन केले जात आहे. तसेच देशातही याबाबत खबरदारी म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. नाशिक प्रशासन देखील याबाबत सज्ज असल्याचे सांगण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप