नगरपंचायत निवडणूक : देवळा नगरपंचायतीत भाजपचे कमळ फुलले!

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यातील सहाही नगरपंचायतीचे निवडणूक निकाल हाती येण्यास सुरवात झाली असून देवळा नगरपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल हाती आला आहे. येथील नगरपंचायतीत भाजपाने बाजी मारली आहे.

पहा वार्डनिहाय विजयी उमेदवार

प्रभाग क्र. ०१ ऐश्वर्या जगण आहेर, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रभाग क्र. ०२ भूषण बाळू गांगुर्डे, भाजपा, प्रभाग क्र. ०३ आश्विनी सागर चौधरी, भाजप, प्रभाग क्रमांक ४ आहेर सुलभा जितेंद्र, भाजपा, प्रभाग क्रमांक ५ जितेंद्र रमण आहेर, भाजप, प्रभाग क्रमांक ६ शीला दिलीप आहेर, भाजप.

प्रभाग क्रमांक ७ अनुसूचित जाती कैलास जिभाऊ पवार, भाजप, प्रभाग क्रमांक ८ आहेर भारती अशोक, भाजपा, प्रभाग क्रमांक ९ अनुसूचित जाती महिला राखी रोशन बिलोरे, भाजप, प्रभाग क्रमांक १० करण शरद आहेर, भाजपा, प्रभाग क्रमांक ११ भाग्यश्री अतुल पवार, भाजप.

प्रभाग क्रमांक १२ रत्ना ललित मेतकर, भाजप, प्रभाग क्रमांक १३ अशोक संतोष आहेर बिनविरोध भाजपा, प्रभाग क्रमांक १४ सुनंदा साहेबराव आहेर, भाजप, प्रभाग क्रमांक १५ संजय तानाजी आहेर, बिनविरोध भाजपा, प्रभाग क्रमांक १६ पुंडलिक संपत आहेर, भाजप.