Budget2022 : राज्याचा अर्थसंकल्प सादर, पहा महत्वाच्या १० घोषणा

मुंबई । प्रतिनिधी

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session) अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. महाविकास आघाडीचा २४ हजार ३५२ कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. वर्ष २०२२-२३ या वर्षासाठी असलेल्या या अर्थसंकल्पात विविध विकास योजना आणि करप्रणालीवल भर देण्यात आला आहे. प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, सामाजिक कार्य आणि पर्यावरण या विषयांवर अधिक भर देण्यात आला आहे.

अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला प्रत्येकी ५० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली. याशिवाय सिंचन प्रकल्पांवरही लक्ष्य केंद्रीत करण्यात आले असून, येत्या २ वर्षांत १०४ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. संभाजीराजे महाराजांचं स्मारक हवेली येथे उभारण्यात येईल. त्यासाठी २५० कोटीची तरतूद करुन देण्यात आली आहे अशी माहिती अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान दिली. मुंबईतील पशुवैद्यकीय रुग्णालयाला १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय सुदृढ पशुधनासाठी ३ फिरत्या पशुशाळा उभारण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मुंबईतही पशुवैद्यकीय रुग्णालयाला १० कोटी रुपयांचा निधी आणि सदृढ पशुधनासाठी ३ फिरत्या पशुशाळा उभारण्यात येणार आहेत.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ७५ हजार रुपयांचे अनुदान

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ७५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. हे अनुदान पूर्वी ५० हजार इतके होते. आता त्यात वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी यंदाच्या वर्षात ६० हजार कृषी पंपांना वीज देण्याचे महाविकासआघाडी सरकारचे लक्ष्य आहे. तसेच ०१ लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागा उभारण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा मानस आहे. जलसंपदा विभागाला आणखी सक्षम करुन चालणा देण्यासाठी १३ हजार २५२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय शेततळ्यांच्या अनुदानाच्या रकमेतसुदधा वाढ करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पातील काही ठळक मुद्दे

नाशिक- पुणे रेल्वे मार्गाचा ८० टक्के खर्च राज्य सरकार उचलणार
एसटी महामंडळाला १ हजार नवीन बसेस देणार; अजित पवारांची मोठी घोषणा
सोन्यावरील मुंद्राक शुल्क माफ
सीएनजी स्वस्त होणार; सीएनजीवरील कर १३. ५ टक्क्यांवरुन ३ टक्क्यांवर
पुण्यातील फुलेवाड्यासाठी १०० कोटींचा निधी देणार
नवी मुंबईत मराठी भाषा संवर्धन केंद्र उभारणार
प्रत्येत जिल्ह्यात पुस्तकांचे गाव उभारणार
मराठी भाषेच्या विकासाठी मुंबईत मराठी भाषा भवन उभारण्यात येणार; गुढीपाडव्याला भूमीपुजन होणार
राजगड, तोरणा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ल्यांच्या संवर्धनासाठी १४ कोटींची तरतूद
शिर्डी विमानतळासाठी १५०० कोटी
परिवहन विभागाला ३ हजार ३ कोटी रुपये
समृद्धी महामार्ग भंडारा गोंदिया आणि गडचिरोली पर्यंत विस्तार
मॅगनेटिक महाराष्ट्रः भविष्यात ३ लाख ३० हजार नोकऱ्या देणार
राज्यातील तृतियपंथीयांना स्वतंत्र आधारकार्ड आणि रेशनकार्ड
अनेक जिल्ह्यात महिला रुग्णालय उभारणार
८ मोबाइल कर्करोग वाहन पुरवणार; ८ कोटींच्या निधीची तरतूद

जलसंपदा विभागासाठी १३ हजार २५२ कोटींची घोषणा
संभाजी महाराजांचे स्मारक हवेलीत उभारणार, २५० कोटींची तरतूद; अजित पवारांची घोषणा
मुख्यमंत्री शाश्वत निधी योजना, शेततळ्यासाठी अनुदानात ७५ हजारापर्यंत वाढ