नाशिक | प्रतिनिधी
हॅलो! हा भुजबळ बोलतोय, उद्या या म्हटलं संमेलनाला, हो हो नक्की येणार तिकडून फडणवीसांचे होकारार्थी उत्तर..! अखेर निमंत्रणाच्या नाराजी नाट्यावर पडदा पडला आहे.
दरम्यान संमेलनाच्या पत्रिकेत नावावरून निर्माण झालेल्या वादाला पूर्णविराम मिळाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शनिवारी साहित्य संमेलनास उपस्थित राहणार असून महापौर सतीश कुलकर्णी साहित्य संमेलनात सक्रिय सहभाग नोंदविणार आहे.
याबाबत भुजबळ यांनी फडणवीस यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करत त्यांच्याशी चर्चा केली. या दोघांनीही साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे.
तर आज सकाळपासून झालेल्या पावसांनंतर भुजबळ यांनी संमेलनस्थळी पाहणी केली. यामध्ये त्यांनी म्हटले की, मुख्य मंडपाला काही झालेले नसून मोकळ्या जागेवर होणाऱ्या कवीकट्टा आणि बालकाव्य या कार्यक्रमाना पावसाचा फटका बसू शकतो. मात्र तर कार्यक्रम सभागृहात होतील असे त्यांनी सांगितले. तर संमेलनस्थळी उभारलेले २५० स्टॉल्स हे वॉटरप्रूफ असल्याने त्यांना धोका नाही मात्र पावसाचं पाणी काही मंडपात येत असल्याने ते काढावे लागणार आहे.