शनिवार, जून 3, 2023
घरताज्या बातम्यागोर गरिबांची एसटी आहे, जास्त ताणू नका..!

गोर गरिबांची एसटी आहे, जास्त ताणू नका..!

नाशिक | प्रतिनिधी
एसटीचा संप अद्यापही सुरूच आहे, राज्य सरकारने तोडगा काढला असतांना एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. परंतु एसटी गोर गरिबांची आहे, त्यामुळे जास्त ताणू नका असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

ते कळवण येथे विविध भूमीपूजनाच्या कामानिमित्त आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, कोरोनाचे नवे संकट उभे ठाकले असतांना एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह आम्हीं सर्वजण बसलो. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने यावर पर्याय काढला. मात्र हा निर्णय देखील एसटी कर्मचाऱ्यांना मान्य नसल्याने सरकारने करायचे काय? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

आपली एसटी ही गोरगरिबांची असून या संपाचा सर्वात जास्त त्रास गोर गरीब जनतेला होत आहे. सरकारला वेळ द्या, जास्त ओढाताण करत बसू नका, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

दरम्यान येत्या ०१ डिसेंबर पासून शाळा सुरू करत आहोत. त्या पार्श्वभूमीवर एसटी सुरु होणे आवश्यक आहे. मात्र एसटी कर्मचारी संपावर ठाम असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे.त्यामुळे तुम्ही ही महाराष्ट्रातील आहेत, जनतेचा विचार करावा असे कळकळीचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

त्या पुढे म्हणाले की, यापूर्वी गिरणी कामगारांनी आपल्या मागण्यासाठी असे आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांची वाईट स्थिती झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी लक्षात घेऊन सरकार आपल्या मागण्या पूर्ण करेल यात शंका नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप