नाशिक जिल्ह्यास काही कमी पडू देणार नाही : उपमुख्यमंत्री

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्हा हा पहिल्यापासून महाविकास आघाडी सरकारच्या पाठीशी आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्यास काही कमी पडू देणार नाही. कोणतेही काम असो नाशिक जिल्ह्यावर अन्याय होवू दिला जाणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित यांनी दिले.

ते कळवण येथील विविध कामांच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की रस्ते हे विकासाचे माध्यम आहे. मला जरी यायला उशीर झाला असला तरी नाशिक जिल्ह्यास अशी कुठलीही समस्या येणार नाही असे प्रतिपादन यावेळी पवार यांनी केले.

ते पुढे म्हणाले की रस्त्यांच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. कारण इतर जिल्ह्यात रस्त्याच्या कामात जास्त निधी दिला जातो, नाशिकवर अन्याय होतो अशी खंत आमदारांनी व्यक्त केली असल्याने नाशिक जिल्ह्यावर अन्याय होवू दिला जाणार नाही. नाशिक जिल्हा महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभा आहे काहीही कमी पडू देणार असे ठोस आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

मात्र आता खर्च वाढल्याने पूर्वी सारखा रस्ता बनविने स्वस्त नसल्याचे त्यांनी बोलून दाखविले.